पुणे : राजमुद्रा ढोल ताशा पथक गेल्या १८ वर्षांपासून पुण्याबरोबर महाष्ट्रात अनेक ठिकाणी आपली शिस्तबद्ध पद्धतीने कला सादर करत आहे. यातून मिळणाऱ्या उत्पनातील खर्च वजा जाता काही वाटा समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी दरवर्षी उपयोगात आणत आहेत.याहि वर्षी राजमुद्रा पथकाने सराव शुभारंभासाठी येणारा खर्च करण्याऐवजी वाद्य पूजन समारंभ श्री साई सेवा संस्था या विशेष मुलांच्या शाळेत त्यांना जीवनावश्यक गोष्टी आणि आर्थिक मदत देत केला
याप्रसंगी कर्वेनगर पोलीस चौकीचे सहा पोलीस निरीक्षक महेश्वर तळेकर आणि वारजे पोलीस स्टेशन येथील सहा. पोलीस निरीक्षक अमोल वलेकर आणि साई सेवा संस्थेचे संदीप मुके आदी उपस्थित होते.
सध्या पुण्यात ३५० हुन अधिक ढोल ताशा पथके आहेत. त्याचबरोबर वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ हा ” इव्हेंट ” नजीकच्या काळात पुढे येऊ लागला. राजकीय ,समाजातील प्रतिष्टीत व्यक्तींच्या हस्ते हा कार्यक्रम करणे, त्यासाठी फ्लेक्सबाजी , डिजिटल कॅम्पेन, धवनीक्षेपक यंत्रणा, सजावट हा ट्रेंड आता वाढू लागला आहे.
अनेकदा ढोल पथके, त्यांची आर्थिक गणिते, वादकांची अरेरावी, वाहतूक समस्या अश्या प्रश्नांवर चर्चा उपस्थित होत असताना वेगळ्या वाटेने जाणारी काही पथके आहेत आणि त्यातील एक पथक म्हणजे “राजमुद्रा ढोल ताशा पथक”.आपल्या उत्पनातील काही वाटा समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी दरवर्षी उपयोगात आणतात.याआधी गेले अनेक वर्षे देवदासी महिलांसाठी, एड्सग्रस्त रुग्णांसाठी, अनाथ मुले, जेष्ठ नागरिक अश्यांसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांना पथकाने यापूर्वी मदत केली आहे. राजमुद्रा पथकाच्या मयूर उतेकर यांनी आभार प्रदर्शन केले