मुंबई – बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे गेल्या एक महिन्यापासून डेटिंग अफेअर्सच्या चर्चेत आहेत. आदित्य-अनन्याचे व्हेकेशन फोटो व्हायरल झाल्यापासून सगळेच कलाकारांच्या प्रेमसंबंधांवर चर्चा करत आहेत. पण आता स्वतः आदित्य रॉय कपूरने अनन्यासोबत डेटिंग रूमर्सवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दोघांच्या अफेअर्सबाबत सध्या बॉलिवूडचं नाही तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील मोठी चर्चा सुरु आहे. अशात आदित्यने दिलेले प्रतिक्रियेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान आदित्यने आपल्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर मोठ्या चतुराईने उत्तरे दिली. यावेळी आदित्यने अनन्या सोबतच्या नात्याबाबत बोलताना नकारही दिला नाही आणि हो देखील म्हंटले आहे.
आदित्य म्हणतो की, “जोपर्यंत या प्रकरणावर चर्चा होत आहे, तोपर्यंत सर्व काही ठीक चालले आहे. अंदाज बांधणे हे काम आहे आणि गोष्टी प्रवाहात गेल्या पाहिजेत. मला असं वाटत कि या विषयाला केवळ चर्चांपुरतच ठेवलं पहिजे. कारण जोपर्यंत या चर्चा सुरु आहेत तोपर्यंत चांगली बाब आहे” असं म्हणत आदित्यने सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या अफेअर बाबतची पहिली अफवा आठ महिन्यांपूर्वी समोर आली होती. जेव्हा हे दोन्ही कलाकार करण जोहरच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. यानंतर चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या कॉफी विथ किरण या शोमध्ये आदित्य आणि अनन्याच्या नात्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लॅक्मे फॅशन वीकमध्ये दोन्ही कलाकारांनी त्यांची हॉट केमिस्ट्री दाखवली. पण त्यानंतर आदित्य अनन्याचे व्हेकेशनचे फोटो लीक झाले. तेव्हापासून दोघांच्या अफेअरची चर्चा वाढली.