पुणे- आगामी काळात युद्धाचे स्वरूप हे आण्विक, जैविक आणि रासायनिक (एनबीसी) या प्रकारातील असण्याची शक्यता वर्तविली जाते. अशा धोक्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्यदल आणखी सक्षम होत आहे.
प्रदर्शनातील संसाधने
सैन्य दलासाठी आवश्यक असणारे “दक्ष’ रोबोट, माऊंटन फूट ब्रीज, अग्निशमन संसाधने, अग्निरोधक कपडे, नावीन्यपूर्ण लष्करी “कॉमोफ्लॉज’ गणवेश, स्वदेशी बनावटीचे जनरेटर आणि इंजिन, सीमाभागात वापरली जाणारी स्फोटरोधक वाहने, बुलेटफ्रूफ वाहने, पादचारी
उपक्रम काय?
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संरक्षण विभागाच्या गुणवत्ता हमी महासंचालनालयाने गुणवत्ता हमी नियंत्रक कार्यालय, औंध येथे येथे संरक्षण संसाधन प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. यावेळी नियंत्रक ब्रिगेडियर पी. के. श्रीवास्तव उपस्थित होते.
यांचा प्रमुख सहभाग
बीईजी खडकी, आर ऍन्ड डीई दिघी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एल ऍन्ड टी, यांच्यासह 17 हून अधिक खासगी कंपन्यांनी आपली उत्पादने या प्रदर्शनात सादर केली.
विद्यार्थ्यांना प्रेरणा
यावेळी चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यातून संरक्षण क्षेत्रात आपल्या देशाच्या सज्जतेची माहिती विद्यार्थ्यांनी कुतूहलाने घेतली.
सैन्यदलाला आवश्यक शस्त्र आणि संसाधनांवर व्यापक संशोधन आणि त्यांची निर्मिती यावर भर दिला जात आहे. यासाठी स्वदेशी उत्पादनांची निर्मितीही केली जात आहे. भारतीय सैन्य हे शत्रूंच्या हल्ल्याचा सामना करण्यास सक्षम आहे.
– पी. के. श्रीवास्तव,
संरक्षण संसाधने गुणवत्ता हमी नियंत्रक
आत्मनिर्भर भारत सह संकल्पना आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. संरक्षण निर्मिती क्षेत्रातील त्याची आवश्यकता आहे. संरक्षण निर्मितीत आपण समृद्ध झालो, तरच देशाचे रक्षण करण्यास सक्षम ठरू.
– कृष्ण प्रकाश,
पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड