पुणे : वडिलांनी नऊ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या पत्नीच्या आरोपातून पतीची सत्र न्यायाधीश एस.एस.गुल्हाने सव्वा सहा वर्षाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये याबाबत वाकड पोलिसात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८,१२, विनयभंग आणि धमकाविणेच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता.
बचाव पक्षातर्फे अॅड. प्रमोद पाटील, अॅड.विश्वास पाटील, अॅड. सौरभ पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. अमोदकुमार, अॅड. पंकज पुरोहित यांनी सहाय्य केले. पत्नी, मुलगी , सोसायटीचे चेअरमन व चौकशी अधिकारी यांची साक्षीदार म्हणून तपासणी केली.
तर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रमोद पाटील यांनी युक्तीवाद केला की, गुन्हा घडला, त्यावेळी आरोपी सोसायटीत नव्हता. पत्नीचे लग्नापासून मित्रासोबत प्रेमसंबध आहेत. पती याला अडसर ठरत आहे. या रागातून तिने खोटी फिर्याद दिली आहे. तसेच पत्नीने जमीन फसवून स्वत:च्या नाववर करून घेतली आहे. त्यामुळे पतीची निर्दोष मुक्तता करावी.