शिक्रापूर – सणसवाडी येथील एल अँड टी फाटा येथे गुरुदत्त इंजीनियरिंग कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने काम सुरु असताना क्रेनमधील डिक्स अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धम्मपाल तुकाराम इंगोले असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
सणसवाडी येथील कंपनीमध्ये इंगोले हा कामगार कामाला आहे. रविवारी (दि. 8) सकाळच्या सुमारास क्रेनमधील डिक्स धम्मपालच्या अंगावर पडली. कामगारांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने र्डाक्टरांनी घोषित केले.