जळोची -नागपूर येथील मोटर वाहन निरीक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करून दंडाची शासकीय रक्कम स्वतःच्या वापरासाठी 18 महिने वापरल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशाच प्रकारे बारामतीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी 2010 ते 2012 दरम्यान तब्बल 83 लाख 54 हजार 785 रुपयांचा व्यवसायकराचा अपहार केल्याचे उघड झाले होते. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. नागपूर कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तसाच गुन्हा बारामतीतील तत्कालीन त्या दोन अधिकाऱ्यांवर दाखल करण्याची मागणी होत आहे.
बारामती आरटीओ कार्यालयात तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद मल्हारी जाधव यांनी नागरिकांनी भरलेल्या व्यवसाय करामध्ये लाखोचा भ्रष्टाचार, अपहार केल्याचे उघड झाले होते. मात्र, तत्कालीन राज्याचे सेवानिवृत परिवहन आयुक्त वि. ना. मोरे यांनी त्यांची पाठराखण करीत सेवानिवृत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, संबधित जबाबदार वरील दोन्ही अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचा आरोप वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्य्क्ष दिगंबर पडकर यांनी केला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बारामती आरटीओ कार्यालयात तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव या दोघांनी नागरिकांनी भरलेल्या व्यवसाय कराच्या 83 लाख 54 हजार 785 रुपयांचा भ्रष्टाचार करुन अपहार केला होता. तत्कालीन सेवानिवृत परिवहन आयुक्त मोरे यांनी कारवाई केली नाही. मोरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्याचे तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगड़े यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे पडकर यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर झगडे यांनी बारामतीचे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांना बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात (दि.9) जानेवारी 2015 रोजी बारामती आरटीओ कार्यालयात 83 लाख 54 हजार 785 रुपयांचा व्यवसाय कराचा भ्रष्टाचार,अपहार झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र, यामधून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांना वगळून तत्कालीन सेवानिवृत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता 2010 ते 12 दरम्यान 83 लाख 54 हजार 785 इतकी शासकीय रक्कम कार्यालयाच्या उपोषाकारामधील रोज कीर्दमध्ये आढळून आली नव्हती, ही बाब उघड झाली होती.
तत्कालीन राज्याचे सेवानिवृत्त परिवहन आयुक्त वि. ना. मोरे यांच्या आदेशावरून ती रक्कम व्याजासह अंदाजे 1 कोटी 43 लाख 785 रूपये दोन वर्षांनंतर टप्प्या, टप्प्याने सरकारी तिजोरीत भरण्यात आली. मात्र, संबंधित दोषी असणारे अधिकारी अद्याप मोकाट असून त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाणार का, अशी चर्चा सध्या बारामतीत सुरू आहे.
बारामती आरटीओ कार्यालयातील अपहार प्रकरणाबाबतची सर्व माहिती घेतो. चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल
– विवेक भिमनवार,परिवहन आयुक्त,