लोणी देवकर – इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. नुकतेच सर्व प्रक्रिया पार पाडून सर्व पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांच वाटप करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने न्हावी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरशीच्या होत असलेल्या निवडणुकीत राजकीय पुढाऱ्यांना कंटाळलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत नवा पायंडा घातला आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचे किंवा पुढाऱ्यांचे फोटो न लावता त्यावर सर्व महापुरुषांचे फोटो लावले आहेत.
एरवी दोन राजकीय गटात निवडणूक होत असते; परंतु यंदा न्हावी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी नवा पायंडा घातला आहे. यामध्ये स्थानिक मूलभूत प्रश्नसोबतच पर्यावरण, आरोग्य, स्त्री सशक्तीकरण,
शिक्षण याचबरोबर राजकारण विरहित महापुरुषांचे विचार आचरणात आणून सामाजिक विषयांचा अजेंडा घेतला आहे. त्यामुळे यंदा होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणता शाहू फुले आंबेडकर पॅनल कोणता करिष्मा करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.