इंदापूर – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मातोश्री ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा गारटकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आस्थेने केली. प्रदीप गारटकर यांचे ऋणानुबंध,विविध राजकीय पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी राज्यात व परराज्यात आहेत. यापैकीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी स्नेह प्रदीप गारटकर यांचा जुना आहे.
या हॉस्पिटलमध्ये खासदार गिरीश बापट उपचार घेत आहेत त्यांना भेटण्यासाठत केंद्रीय मंत्री गडकरी हे आले होते; मात्र या उपचार वॉर्डामध्येच प्रतिभा गारटकर उपचार घेत असल्याने प्रदीप गारटकर या ठिकाणी होते.
प्रदीप गारटकर दिसताक्षणी गडकरी यांनी त्यांच्या आई प्रतिभा गारटकर उपचार घेत असल्याचे समजले. लगेचच त्यांनी प्रतिभा गारटकर यांच्या वार्डात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली,मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यामुळे राजकारणापलीकडची मैत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज देखील सांभाळत आहेत याचा प्रत्यय आला.
प्रदीप गारटकर म्हणाले की,माझ्या आईशी व माझ्या कुटुंबीयांशी आस्तेने विचारपूस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. अनेक वर्षापासून कौटुंबिक संबंध गडकरी परिवाराशी असल्याने त्यांचे प्रेम आजही तसेच आहे.
सामाजिक सार्वजनिक जीवनात केंद्रीयस्तरावर काम करणारे नेते आजही त्रुणानु बंधाची नाळ विसरत नाहीत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वरिष्ठ क्रमांक लागतो. यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद अधिकचे काम करण्यास बळकट करतात असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.