रणबीर आणि श्रद्धा अभिनीत लव रंजनचा आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’च्या फर्स्ट लूक पोस्टरचे अलीकडेच अनावरण झाले असतानाच, या चित्रपटाच्या अनोख्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगात आहे. तसेच, टायटल घोषणेसह प्रेक्षकांवर इतका प्रभाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे ‘तू झूठी मैं मक्कार’हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात प्रभावी शीर्षक घोषणांपैकी एक ठरला आहे. अशातच, लव रंजनचे चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतात तेव्हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी पहिली गोष्ट म्हणजे शीर्षक.
‘तू झूठी मैं मक्कार’ हे लव रंजनच्या आगामी चित्रपटाचे एक अनोखे शीर्षक आहे ज्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली असतानाच, दर्शकांमध्ये दिवसेंदिवस चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढत आहे. तसेच, बर्याच काळानंतर बॉलीवूड पुन्हा एकदा एपिक प्रेमकथा आणि रोमान्ससह रणबीर आणि श्रध्दा अभिनीत या चित्रपटामार्फत परतले असून प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे. ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘छलांग’, ‘प्यार का पंचनामा 2’ यांसारखे अनेक चित्रपट दिल्यानंतर ‘तू झूठी मैं मक्कार’च्या घोषणेने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे, असे म्हणता येईल.
लव रंजनने आपल्या चित्रपटांच्या शीर्षकांसाठी वन-लाइनर निवडण्यात आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यांच्या आगामी रोमँटिक चित्रपटाचे नाव ‘तू झूठी मैं मक्कार’ आहे. यासारखे आकर्षक चित्रपटांचे टायटल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्साह आणि अपेक्षा निर्माण करतात, ज्यामुळे दर्शक चित्रपटाकडे अधिक आकर्षित होतात. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.