पुणे – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी लोणावळा-पुणे-दौंड विभागाची पाहणी करत, विविध कामांचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांनी रेल्वेमार्ग आणि प्रवासी सुरक्षेवर अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
लाहोटी यांनी बुधवारी विविध रेल्वे मार्गांची पाहणी केली. या प्रसंगी विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महाव्यवस्थापकांनी पुणे यार्ड फेरनिर्माण कामांची पाहणी केली आणि त्याच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच रेल्वे ट्रॅक, इलेक्ट्रिकल ओव्हरहेड उपकरणे (ओएचई), पुलांची स्थिती, लोणावळा-पुणे-दौंड येथून सिग्नल यंत्रणा यासह सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करून कामांचा आढावा घेतला.