कोथरूड – कचरा वेचक-वाहक या कष्टकरी वर्गाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रशासन उदासीन दिसते. त्यांनी एक दिवस काम केले नाही तर शहराची काय अवस्था होईल, याचा विचार प्रशासनाने करावा म्हणूनच कष्टकरी वर्गाची दिवाळी गोड होण्यासाठी विजय डाकले यांनी घेतलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुक माजी मंत्री रमेश बागवे यांनी केले.
कचरा वेचक-वाहक संघटनेच्या वतीने कोथरूड भागातील कचरा वेचक, वाहकांना दिवाळी फराळ देण्यात आला. संघटनेचे प्रमुख विजय डाकले यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात रमेश बागवे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल गेहलोत यांच्या हस्ते सेवकांना दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी उमेश भेलके, अजय भुवड, जयदीप पडवळ, संदीप मोकाटे, अनिरुद्ध खांडेकर, बाळासाहेब खंकाळ, संघटनेचे अध्यक्ष नामदेव पुलावळे, उपाध्यक्ष महादेव भिसे, अमोल जाधव, हंसराज गायकवाड उपस्थित होते.