पुणे – एका खासगी महाविद्यालयातील शिक्षकाची क्रेडीट कार्डव्दारे फसवणूक करण्यात आली. त्याची 89 हजार 949 रुपयांची फसवणूक केली गेली. याप्रकरणी पश्चिम बंगाल, गुजरात आणी आंध्र प्रदेशातील बॅंक खातेधारकांविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी हे लोणी काळभोर येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्याकडे कोटक महिंद्रा बॅंकेचा क्रेडीट कार्ड व स्टेट बॅंक ऑफ इंडिया चे क्रेडीट कार्ड आहेत. ते दोन्ही क्रेडीट कार्डसची सर्व डिटेल्स क्रेड ऍप या ऍपवर अपलोड करुन त्याद्वारे सर्व पेमेंट करतात. त्यांनी ऍपवरुन बॅंक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून 89 हजार 949 अशी रक्कम भरणा केली.
परंतु त्यांना कोणताही एस.एम.एस संदेश प्राप्त न झाल्याने, त्यांनी ऍपच्या कस्टमर केअर क्रमांकावर साधला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने ईमेल आय.डी दोन्ही बॅंकेच्या क्रेडीट कार्ड वरील कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी डेट व गुगल सिक्युरीटी कोड अशी माहीती भरण्यास सांगितली. माहीती क्रेड ऍपवरील ऍड्रेस मेन्यु मध्ये टाईप करुन भरताच त्याने फिर्यादीच्या जी मेल अकाउंट पासवर्ड त्याचेकडील मोबाईलद्वारे रिसेट करुन मोबाईल फोन व जी मेल अकाउंट हॅक करुन त्याद्वारेवर दोन्ही क्रेडीट कार्डद्वारे रक्कम वर्ग करुन घेतली.