इंदापूर – बावडा येथे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ग्रामसचिवालया समोरील टॉवरवर चढून दोन मराठा युवकांनी मंगळवारी (दि. 31) दुपारी तीन तास आंदोलन केले.
दुपारी 2 वाजता ओम घाडगे व प्रदीप डोके या दोन युवकांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. त्यानंतर आंदोलनस्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलीसही आंदोलनस्थळी दाखल झाले.
तरीही मराठा आंदोलनकर्ते युवक खाली उतरण्यास तयार नव्हते. शेवटी तीन तासांनी या आंदोलनकर्त्यांना मराठा युवकांना खाली उतरवण्यामध्ये ग्रामस्थांना यश मिळाले.