भाजपा किसान मोर्चाच्या शिंदे यांची भेट
शिक्रापूर – शेतकऱ्यांच्या समस्या जाऊन घेऊन विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देत शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणाऱ्या मार्केट यार्डच्या समस्या सोडवणार असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी सांगितले.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्मवीर संभाजी मार्केट उपबाजार येथे नुकतेच शिंदे यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे, सुरज शेलार, आडते असोशियनचे अध्यक्ष बापू गावडे, उपाध्यक्ष धनंजय भुजबळ, ज्येष्ठ व्यापारी नरसिंग ढोकले, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शेळके, चांगदेव नरवडे, निलेश ननवरे, शरद उमाप, सतीश बांगर, नवनाथ ढोकले, अतुल तांबे, हर्षद पिंपळे, बापूसाहेब ढोकले उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत ते सोडवण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. मात्र, याच वेळी पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला चिखलात ठेवावा लागत असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. आपण प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन पुढील दोन महिन्यांत संपूर्ण मार्केट यार्डमध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरण करुन देणार असल्याचे देखील शिंदे यांनी जाहीर केले.
दरम्यान, शिंदे यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना चिक्कीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वतीने शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. शिरुर बाजार समितीचे सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी आभार मानले.