कापूरहोळ – भारतीय संविधान आणि बलिदान दिन २६/११ स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे नसरापूर ( ता. भोर ) येथे सिध्दीविनायक हॉस्पिटल, साई मित्र मंडळ आणि पुणे ब्लड बँक, हडपसर यांच्या संक्युक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
गेल्या 15 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यावर्षी 57 जणांनी रक्तदान केले. आतापर्यंत 1 हजार 548 जणांनी रक्तदान करून 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहिद जवानांस श्रध्दाजंली वाहली आहे.
या कार्यक्रमास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कोंढाळकर, खरात , डॉ. राजेंद्र डिंबळे , माजी सैनिक आप्पा बागल, साई मित्र मंडळचे अध्यक्ष अविनाश कोंडे, अमित खुटवड, ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.