पवार म्हणतात माझी तर अजित पवारही म्हणता माझी स्वाक्षरी
जळोची – बारामती तालुक्यातील जनाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न यावर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे चांगलाच ऐरणीवर आला आहे. या प्रश्नात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकाच वेळी लक्ष घातल्याने राजकीय भुयादेखील उंचविल्या आहेत.
दोन दिवसापूर्वी बारामती भागातील शेतकरी अगोदर सुप्रिया सुळे यांना आणि नंतर शरद पवार यांना भेटले होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, या योजनेची स्वाक्षरी मीच केली.
मीच त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर ही बैठक झाल्याची समजताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने सुपे येथे आढावाची बैठक घेतली आणि यामध्ये ही सगळी कामे फक्त आपणच करू शकतो असे ठामपणे सांगितले आणि त्यावरून सुरू झालेली श्रेय वादाची लढाई आज तर चक्क शरद पवार यांच्या स्वाक्षरीपर्यंत पोचली.
पत्रकारांनी रविवारी (दि. 21) अजित पवारांना प्रश्न विचारला की, शरद पवार म्हणतात की, या योजनेची मंजुरी माझ्याच स्वाक्षरीने झाली. त्यावर एकही क्षण न दवडता अजित पवार म्हणाले की, तुम्ही मुंबईत या तुम्हाला फाइल दाखवतो, कोणाची सही आहे ते.
यावरून या पुढच्या काळात जनाई उपसा सिंचन योजना कोणी सुरू केली यावरून अनेक प्रश्न उद्भवणार आहेत आणि त्याचबरोबर बारामतीच्या राजकारणाची लढाई आता काका पुतण्यांमध्ये लढली जाईल अशाच स्वरूपाची थेट चिन्हे या निमित्ताने दिसून आले आहे.