उद्योजक हरीष येवले पाटलांकडून घाटासाठी सव्वा लाखांचा धनादेश
शिक्रापूर – धानोरे (ता. शिरूर) येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने तीन दिवसीय बैलगाडा शर्यतीच्या आयोजन करण्यात आलेले असून, यामध्ये तब्बल तीनशे बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला आहे.
धानोरे ग्रामपंचायत तसेच धानोरे यात्रा कमिटीच्या वतीने नुकतेच श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने भव्य गावातील हिंदकेसरी घाट येथे दोन दिवसीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीनशे बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. शर्यती यशस्वी होण्यासाठी उद्योजक हरिष येवले पाटील, माजी उपसरपंच भानुदास भोसुरे, पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना भोसुरे, माजी सरपंच भरत भोसुरे, पोलीस पाटील स्वप्नील झगडे,
माजी उपसरपंच वैशाली येवले पाटील, राजेंद्र माशिरे, अशोक ढोकरे, बापूसाहेब शेळके, संजय भोसुरे, किसन रोकडे, शांतीलाल भोसुरे, हेमंत सस्ते, माऊली तनपुरे, संभाजी माशिरे, संजय कामठे, प्रदीप भोसुरे, विजय डफळ, कालिदास झगडे, मोहन कामठे यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान बैलगाडा घाटासाठी उद्योजक हरिष येवले पाटील यांच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला, तर आज बैलगाडा शर्यतीला पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र काळे यांनी भेट दिली असता पंधरा लाखांचा निधी बैलगाडा घाटाच्या विकासासाठी देत असल्याचे जाहीर केले.
तर बैलगाडा प्रेमींना हजारोंचे बक्षीस देत प्रोत्साहित करण्यात आले असून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे परिसरात बैलगाडा शर्यतीचा चांगलाच थरार रंगल्याचे दिसून आले आहे.