वडूज – राष्ट्रीय समाज पक्षाच्या खटाव तालुकाध्यक्षपदी विष्णू शिवाजीराव बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, श्रीकांत देवकर, नीलेश लांडगे, दादा बंडगर, विश्वास इंगळे, श्रीकांत रजपूत, गणेश इंगळे, तानाजी देवकर, संतोष देवकर, गणेश कचरे, विक्रम डोईफोडे, अविनाश माने, सिद्धनाथ गोडसे, दत्ता साळुंखे, निखिल इंदापुरे, सागर पवार, पप्पू निकाळजे, विठ्ठल नलावडे, मारुती चव्हाण, मंगेश पवार, अनुप देवकर, शशी देवकर, राम देवकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विष्णू बनसोडे यांनी यापूर्वी युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी पाच वर्षे काम केले होते. गावगाड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पक्षाची आणि अध्यक्ष महादेव जानकर यांची विचारधारा पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठांनी त्यांना तालुकाध्यक्षपदी संधी दिली आहे. हनुमंतराव घाडगे यांची तालुका सचिवपदी आणि अन्य पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.