मंचर बाजारात भाव वधारले : बळीराजा समाधानी
मंचर – कांद्याच्या बाजारभावाने 10 किलोस 300 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्यास रविवारी (दि. 13) उच्चांकी 325 रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आठवड्यातील रविवार, मंगळवार व गुरुवार या तीन दिवशी कांद्याची लिलाव पद्धतीने विक्री होते. रविवारी लिलावाच्या दिवशी 25 हजार कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
मंचर बाजार आवारात खेड व शिरूर तालुक्यातून प्रामुख्याने कांद्याचे आवक होत असते, अशी माहिती बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली.क ांद्याचे बाजारभाव चढते राहण्याची शक्यता उपसभापती सचिन पानसरे यांनी व्यक्त
केली आहे.