मंचर -ठाणे-मंचर मार्गे वडगावपीर बससेवा सुरु झाली आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील 10 गावांतील प्रवाशांची सोय झाली आहे, अशी माहिती मंचरचे वाहतुक नियंत्रक संभाजी दाते यांनी दिली.
22 मार्चपासुन ठाणे आगाराची ठाणे-वडगावपीर एसटी करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आली होती.
मंगळवार (दि. 30) ऑक्टोबरपासुन ठाणे-वडगावपीर एसटी सुरु झाल्याने मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव कारखाना, लोणीधामणी, वडगावपीर या गावांतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सोय झाली आहे. ठाणे येथून सकाळी साडेसहा वाजता बस निघते.
मंचर बसस्थानक येथे सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचते. वडगावपीर येथून आल्यावर मंचर मार्गे ठाण्याकडे जाण्यासाठी दुपारी दोन वाजुन पंधरा मिनिटांनी मार्गस्थ होते, अशी माहिती निरगुडसर येथील प्रवासी रामदास भोर यांनी दिली. या मार्गावरील एसटी सुरू झाली असुन प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.