पौड : भुकूम (ता. मुळशी) येथील श्रीरामभक्त बुलेटवरून अयोध्येला रवाना झाले आहेत. १६०० किलोमीटरचा प्रवास करून ते आयोजित पोचणार आहेत.
येथील स्वयंभू श्री रामेश्र्वराचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली. तेथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत. यामध्ये विजय ज्ञानोबा माझिरे, राहुल इंगवले, संतोष हगवणे, शाम डांगे, सागर पासलकर, राजू अप्पा करजांवणे, श्री दवे, मनोहर सणस सहभागी आहेत.
या सर्वांना संस्कृती स्कूलचे संस्थापक गिरिजा शंकर मुंगली यांनी भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी माजी उपसभापती भानुदास पानसरे, उपसरपंच निलेश ननावरे, हभप एकनाथ हगवणे,
कैलास आप्पा चोंधे, दिंडी चालक हभप दशरथ वहाळे, सुभाष नामदेव माझिरे, कैलास वाघ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.