रुपाली चाकणकर यांची पुणे मनपा आयुक्तांशी चर्चा
खडकवासला – पुणे महानगरपालिका या ठिकाणी राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली व अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित विभागास दिले आहेत.
प्रामुख्याने नांदेड फाटा ते किरकटवाडी या ठिकाणावरील स्टेट लाइटचे काम आठ दिवसांत पूर्ण करणार. कोल्हेवाडीतील चएउइ च्या कामासाठी बिल्डरकडील अमेनिटीज स्पेसच्या जागा उपल्बध करून देणार. खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, कोल्हेवाडी, सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्यासाठी एक कोटी रूपर मंजुरी.
कोल्हेवाडी पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होण्यासाठी मेन लाईनवरील अनधिकृत 32 नळजोड काढून घेत त्या नागरिकांना उपवाहिनीने पाणीपुरवठा करणार. रस्त्याला पडलेले खड्डे आठ दिवसांत पूर्ण बुजवणार. कोल्हेवाडी व खडकवासला पाणी पंपासाठी 50 कझ चे दोन पंप व 40कझ एक पंप उप्लबध करून दिले.
खडकवासला परिसरातील लांडगे वस्ती जि. प. शाळा येथील स्वच्छालय यांची दुरूस्ती लवकरच करणार. जय प्रकाश नारायणनगर येथील संरक्षण भिंतीची पाहणी करून फंड उपलब्ध करून देणार. खडकवासला ते कोल्हेवाडी सरकारी पांधन रस्त्याचे पहाणी करून लवकरच काम सुरू करणार. नांदेड सिटी या ठिकाणी 50 कि ची मोटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली.
मनपाच्या वतीने सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची माहिती आयुक्तांनी दिली, शहरी गरीब योजना, आयुषमान भारत योजना या झोन पातळीवर राबवण्यात याव्यात ही मागणी मान्य केली गेली. गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रोड वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून आढावा बैठक घेत ज्या पद्धतीने कामे मार्गी लागली तशीच या बैठकीनंतर देखील पूर्ण होतील ही खात्री आहे.
या बैठकीसाठी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहाराध्यक्षा प्रिया गदादे, माजी नगरसेवक अश्विनी भागवत, माजी नगरसेवक अश्विनी पोकळे, नमेशदादा बाबर, माजी नगरसेवक बाळासाहेब कापरे, सुनीता डांगे, राजेंद्र पवार, अध्यक्ष सौरभ मते, युवराज दळवी, अविनाश लगड व सागर कोल्हे मित्रपरिवार आदी मान्यवर उपस्थित होते.