सविंदणे – सविंदणे (ता. शिरूर) येथील सरपंच शुभांगी विठ्ठल पडवळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आंबेगाव शिरूर मतदारसंघाच्या महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे यांनी निवडीचे पत्र दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, आचार विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शुभांगी पडवळ यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर- आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, प्रदीप वळसे पाटील, प्रकाश पवार, अरुण गिरे, वसंत पडवळ, बाळासाहेब भोर, मालुबाई मिंडे, नंदा पुंडे, भाऊसाहेब लंघे आदी मान्यवर उपस्थित होते.