पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदी ॲड. राजेंद्र काळेंची निवड

बारामती (प्रतिनिधी) – येथील ॲड. राजेंद्र काळे यांची पुणे जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार अनिल देसाई यांनी काळे यांची जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख पदी निवड केली आहे.

काटेवाडी येथून शिवसेनेच्या कार्याला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला शाखाप्रमुख विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख असाच चढता आलेख ठेवत 1986 पासून एक संघ पणे व एकनिष्ठेने प्रामाणिकपणे शिवसेना पक्षाची एकनिष्ठ राहून एक कडवट आणि कट्टर शिवसैनिक म्हणून अँड राजेंद्र काळे यांनी शिवसेनेचे काम चालू ठेवले.

शिवसेनेचा भगवा कायम हातात घेऊन अखंडपणे व अविरतपणे शिवसेनेचे कार्य करत राहिले. त्यांच्या या कार्याची वेळोवेळी दखल घेऊन पूर्वी बाळासाहेब ठाकरे व त्यानंतर पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून विभागीय नेते संजय राऊत , विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्या सहकार्याने शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी अँड राजेंद्र काळे यांची पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.