नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे प्रमुख राजकीय नेते प्रचारासाठी फिरत आहेत. बंगालमध्ये मतदान सुरू असताना राजकीय नेत्यांना आपला मोर्चा आता आसाम, तामिळनाडू आणि केरळकडे वळवला आहे. मात्र काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांना आपला नियोजित दौरा रद्द करून क्वारंटाईन व्हावं लागलं आहे.
प्रियंका गांधी करोनाची बाधितांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांनतर त्यांनी कोरोनाची चाचणीही करून घेतली आहे. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र तरी देखील त्यांना होम क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे.
हाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है। मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी। इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ। मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर होम क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. यामुळं मी माझा आसाम दौरा रद्द केला आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व असं त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे.