पिरंगुट – येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अभिनेत्री शितल केकन, अभिनेता सुरेश विश्वकर्मा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ यावेळी पार पडला.
यानिमित्त रंगोत्सव नवनिर्मितीचा, संस्कारांचा, उज्वल भविष्याचा, नैतिकतेचा, प्रेमाचा, संस्कृतीचा, नाती जपण्याचा, परंपरेचा, आधुनिकतेचा, कलागुणांचा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणरूपी रंगांची उधळण प्रेक्षकांवर केली. विद्यार्थ्यांनी भजन, कीर्तन, संगीत, नृत्य, देशभक्तीपर गीते, विविध भाषांमधील गीतांवर नृत्य, समूहगीते, पारंपारिक नृत्य, हिप हॉप, कथक, लावणी, कोळी नृत्य, पोवाडा आदी सादर केले.
आदर्श पालक म्हणून महिमा ओंकार गोळे, रुकसार हुसेन शेख, मनीषा विजय पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुस्तकी ज्ञानाबरोबरच संस्कारांची मूल्य जोपासून आदर्श विद्यार्थी व सर्व गुणसंपन्न आदर्श माणूस घडवणे हेच संस्कार स्कूलचे ध्येय आहे. त्यासाठी शाळा शिक्षक व पालक सर्व मिळून प्रयत्न करू. आपल्या मुलांना आपण वेळ देऊ. प्रत्येक चांगल्या वाईट निर्णयात त्यांच्याबरोबर विश्वासाने उभे राहू व त्यांना कधीही एकटे वाटणार नाही. असे वातावरण निर्माण करू, अशी प्रतिज्ञा सर्व पालकांच्या समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांनी व्यक्त केली.
यावेळी मृगेश सुतारिया, महादेव कोंढरे, संगीता पवळे, राजाभाऊ वाघ, गंगाराम मातेरे, संजय साठे, दीपक गोळे, राजेंद्र बांदल, डॉ. सुनील कुमार ठिगळे, वैभव पवळे, प्रशांत बेनी, सरस्वती साठे, शिवाजी साठे, स्नेहा साठे यांच्या हस्ते करण्यात आले.