अक्षय कुमारच्या “रामसेतू’चे अयोध्यात होणार शूटिंग

अक्षय कुमार याचा आगामी “रामसेतू’ हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंजुरी दिली असून लवकरच अयोध्यात चित्रिकरण करण्यात येणार आहे. अक्षय कुमारने नुकतीच मुंबईत योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. 

या भेटीत अक्षय कुमार याने उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या चित्रपटसृष्टीबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते. दरम्यान, अक्षयने नोव्हेंबरमध्ये दिवाळीनिमित्त “रामसेतू’ नामक आगामी चित्रपटाची घोषणा केली होती.

त्याने ट्विट केले होते की, यंदाच्या दिवाळीला आपण सर्वजण एक पुल (सेतू) निर्माण करून सर्व भारतीयांमध्ये प्रभू श्रीरामांच्या आदर्श कायम राखण्याचा प्रयत्न करू, जे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करेल. या महान कार्याला पुढे नेण्यासाठी आमचे विनम्र प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा हे करणार आहेत. अक्षय कुमारचा प्रोडक्‍शन हाउसच “रामसेतू’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली. मात्र, चाहत्यांमधील उत्सुकता आतापासून शिगेला पोहोचली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.