नायगाव : पुरंदर तालुक्यातील नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रोहिदास तुळशीराम कड यांची बिनविरोध निवड पार पडली.
सोसायटीच्या सर्व सभासदांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून संदिप खेसे यांनी ठरल्या प्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त जागेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली, यावेळी रोहिदास कड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागवान यांनी काम पाहिले.
त्यांना सचिव मंगेश गायकवाड यांनी सहकार्य केले. यावेळी विलास खेसे, जयराम खेसे, संदीप खेसे, संतोष गायकवाड, संदीप ठवाळ, अल्लाउद्दीन सय्यद, चंद्रकांत चौंडकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपाध्यक्ष पुष्पा चौंडकर, संदीप खेसे, काशिनाथ खळदकर, विलास खेसे, संजय होले, रोहिदास शेंडगे, अर्जुन पाटोळे, दिलीप फडतरे, मनिषा मेमाणे, संदीप चौंडकर, प्रकाश कड, चंद्रकांत चौंडकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हरिदास खेसे यांनी तर वसंतराव खेसे यांनी आभार मानले.