जुन्नर -लेखणी बंद आंदोलनामुळे खरेदीविक्री दस्तनोंदणी असल्याने त्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज नोंदणी व मुद्रांक विभागाचे विविध मागण्यांसाठी केलेल्या लेखणीबंद आंदोलनामुळे 1 ऑक्टोबरपासून बेमुदत बंद राहणार असल्याची माहिती दुय्यम निबंधक व्ही. एस. फाळके यांनी दिली.
दुय्यम निबंधक कार्यालयातील अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच अतिरिक्त कामांमुळे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणणे तसेच कर्मचारी संख्येत वाढ आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी नागरिकांची गैरसोय झाली, लेखणी बंद आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत असा फलक कार्यालयाच्या दरवाजावर लावला आहे.