मंचर – राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडसर ता .आंबेगाव येथील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली. यावेळी मतदानावर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन शाळेत करण्यात आले होते.
प्रत्येक गावात मतदानाची टक्केवारी वाढावने, मतदार नोंदणी करणे व्ही व्ही पॅड मशीनचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि त्यातून मतदान प्रक्रियेची पारदर्शकता मतदारापर्यंत पोहचवणे
यासाठी आंबेगाव तालुक्यात तहसीलदार संजय नागटिळक आणि नायब तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती पथकाचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे. निरगुडसर शाळेतील शिक्षक नारायण गोरे हे
स्वीप पथकात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरगुडसर गावात मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका संगीता शेटे आणि सर्व शिक्षकांनी नियोजन करून सहकार्य केले.