पौड – पर्यटकांची पावले शनिवारी, रविवारी मुळशी तालुक्यात वळत असताना भूगावपासूनच वाहतूक कोडी होत आहे. पुण्याकडे जाताना भूगाव येथे पर्यटकांची प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
चांदणी चौक ते कोलाड असणारा रस्ता हा अर्धवट व रस्त्यावर अर्धवट राहिलेली कामे व रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांचा फटका पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. वाहतूक कोंडी काढताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य त्रासले आहेत.
पोलिसांची नाकाबंदी नसल्या कारणाने पुण्यातून व पिंपरी चिंचवड येथून येणारे नागरिक हे मद्य घेऊन येतात आणि मुळशीत येऊन काही हुल्लडबाज मद्यपान करतात. पर्यटनकरिता बुलेटवर येणारे बुलेटचा कर्णकर्कश आवाज करीत व हॉर्न वाजवत जातात त्यामुळे त्यांच्याकडून बाकीच्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
-विशाल राऊत,पौड व्यापारी संघटना संस्थापक अध्यक्ष