आळंदी/चिंबळी – खेड तालुक्यातील आळंदी शहरासह, चिंबळी परिसरात सोमवारी (दि. 23) सकाळ पासूनच झेंडूच्या फुलांनी लक्ष्मी माता चौक, हजेरी मारुती चौक, श्री भैरवनाथ चौक, वडगांव रस्ता व शहरातील विविध ठिकाणचे भाग फुलून गेला होता.
दसऱ्या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले विक्रीला आली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत किरकोळ विक्री किमान दर 40 ते कमाल 50 रुपये किलोपर्यंत होता.
झेंडूचा दर हा त्याच्या प्रति(दर्जा) वरून कमी जास्त प्रमाणात दिसून येत होता. गेल्या वर्षीपेक्षा झेंडूच्या फुलांची आवक यंदा शहरात जास्त प्रमाणात दिसून आली. गेल्या वर्षी( 2022) दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा दर शहरात सकाळी 60 तर संध्याकाळी 80 रुपयांपर्यंत पोहोचला होता.