पारगाव शिंगवे : सदानंदाचा यळकोट व भंडार आणि खोबऱ्याची उधळण करित जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आंबेगाव, जुन्नर, शिरुर, तालुक्यातील भाविक या यात्रेला हजेरी लावली होती. भाविकांनी रांगेत उभे देवाचे दर्शन घेतले. तळी भंडाची उधळण करून नवसपूर्तीची जागर गोधळ घालण्यात आले.
गावामधून बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेत भाविकांनी बैलगाडा घाटातील नवसाच्या बैलगाडा शर्यतींचा आनंद लुटला. तसेच भाविकांनी जिलेबी, भजी, शेव रेवडीचा स्वाद घेतला. नोकरीनिमित्ताने मुंबई, पुणे येथे असणाऱ्या भाविकांनी मित्रमंडळीसह यात्रेला हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटला.
यात्रेनिमित्त पारगाव पोलीस ठाण्याचेे पोलीस सहाय्यक निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद घोडके, उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे व पोलीस नायक संजय साळवे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांनी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.