शेवगाव – विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील विविध विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार निधीसह राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनामधून कोट्यवधी रुपयाचा निधी मतदारसंघातील प्रत्येक गावांत देण्याचा प्रयत्न केला असल्याने विविधविकासाची कामे मार्गी लागली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.
तालुक्यातील मुंगी व कांबी येथे मिळून ११ कोटी ७५ लाखांच्या कामांचे भूमिपूजन आ. राजळे यांचे हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, डॉ निलेश मंत्री, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, सुरेश नेमाने, संदीप देशमुख, अनिल परदेशी, मोहनराव डमाळे, नारायण पाखरे, सुनिल वडघणे, दिगाबर टोके, मुरलीधर लोखंडे, बाबासाहेब धस, कालिदास ढाकणे, सोमनाथ मडके, पांडुरंग तहकीक, बाबा सावळकर, अशोक बाणाईत, बाळासाहेब लवंगे, भागवत तेलोरे, दत्तात्रय उन्मेेघ, सुरेश दिवटे, श्याम बुटे, भगवान तेलोरे, प्रल्हाद तहकीक उपस्थित होते.
आ.राजळे म्हणाल्या की,आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधक हळदी – कुंकासह इतरही कार्यक्रम हाती घेऊन तुम्हाला फसवण्यासाठी पुढे येतील. दिशाभूल करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतील. आपण विकासाची कामे करणाऱ्यांच्या मागे भक्कम ताकदीनिशी उभे रहावे, असे आ.आवाहन राजळे यांनी केले.
जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे, सा.बां.चे शाखा अभियंता शैलेश साबळे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब मुरदारे, भगवान खुरमुरे, कुद्दूसभाई पठाण, लक्ष्मण देवढे, पांडुरंग मिसाळ, श्रीरंग गोर्डे, उमाजी राजभोसले, मधुकर ठुबे, सोमनाथ मडके, मारुती गोर्डे तर कांबी येथे उपसरपंच सुनिल राजपूत, अविनाश म्हस्के, बाळासाहेब खरात, दत्ता थोरात, षाताई होळकर,रासपचे बाजीराव लेंडाळ,राजेंद्र खोसे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.