जुन्नर -जुन्नर तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. बुधवारी नव्याने तालुक्यात 24 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 5966 इतकी झाली आहे. तर 5572 जण या आजारातून बरे झाले आहेत.
बुधवारी उंब्रज नं. 2 मध्ये 7, पिंपळगाव तर्फे नारयणगाव 4, नारायणगाव 3, जुन्नर नगरपालिका व वारुळवाडीत प्रत्येकी 2 तर आनंदवाडी, उदापूर, वडगाव कांदळी, शिरोली बुद्रुक आणि धोलवडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. दरम्यान, जुन्नर तालुक्यात बाधितांची भर पडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.