पिरंगुट – येथे पार पडलेल्या पिरंगुट करंडक 2024 फुल पीच क्रिकेट स्पर्धेत हाडशीच्या सुनील कळमकर स्पोर्टस क्लबने विजेतेपद मिळवले. तर पिरंगुट क्रिकेट क्लबला उपविजेतेपद मिळाले. हाडशी संघाला रोख एक लाख रुपये व चषक तर पिरंगुट संघाला रोख 70 हजार रुपये व चषक देण्यात आला. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात आले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथे समस्त ग्रामस्थ मंडळी व पिरंगुट क्रिकेट क्लबच्या वतीने फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुळशीतील 30 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा अंतिम सामना हाडशी व पिरंगुट संघात झाला.
यामध्ये हाडशी संघाने बाजी मारत विजेतेपद मिळवले. हाडशी संघाचा प्रविण साठे अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेत भुगाव क्रिकेट क्लबने तृतीय, भुकूमच्या रामेश्वर क्रिकेट क्लबने चतुर्थ, न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधनने पाचवा तर पिरंगुट रायझिंग स्टार संघाने सहावा क्रमांक मिळवला. या संघांना अनुक्रमे रोख 50 हजार, 40 हजार, 30 हजार, 20 हजार रुपये व चषक देण्यात आला.
पारितोषिक वितरणप्रसंगी गंगाराम मातेरे, सरपंच चांगदेव पवळे, मारुती पवळे, चंद्रकांत धोत्रे, मधुर दाभाडे, रामदास पवळे, रमेश पवळे, वैभव पवळे, महादेव गोळे, राहुल पवळे, दिपक गोळे, सचिन पवळे, मोहन आवळे, विकास पवळे, प्रविण कुंभार, महेश वाघ, उमेश नलावडे, सुशील हगवणे, राजू पवळे, रोहिदास गोळे, आदी मान्यवर, ग्रामस्थ व खेळाडू उपस्थित होते.
भूगावचा सागरी आंग्रे मालिकावीर
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत भूगाव संघाचा सागर आंग्रेने मालिकावीर किताब मिळवला. त्याला भव्य शिवराज्याभिषेक प्रतिमा व चषक देण्यात आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हाडशी संघाचा धनंजय साठे ठरला. पिरंगुट संघाचा तनुज पवळे स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज तर हाडशी संघाचा प्रविण साठे उत्कृष्ट गोलंदाज ठरला.