वाडा -येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ऍड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात 133 वी कर्मवीर जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन प्राचार्य शिवाजी दुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गरीब विद्यार्थ्यांना कर्मवीर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.
पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना व मिरवणुकीविना साध्या पद्धतीने कर्मवीर जयंती सोहळा साजरा करण्यात आला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे ऑनलाइन नियोजन करण्यात आले. दुपारी 3 वाजता यू ट्यूबच्या माध्यमातून खासदार शरद पवार व संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सेवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी पर्यवेक्षक सतीश हाके, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका बिबीमरियम चाऊस, आशिष कांबळे, शशिकांत पावडे, काळु ढेंगळे, इमरान मुलानी, माणिक पवार, भीमा गोडे, शंकर गुट्टे, संजय येवले, उमेश कोळी, जयेश पागधरे, प्रमिला कडलग, योगिता देवतळे, सुवर्णा शेलार, नाईकडे सुवर्णा, अनुराधा बारमुख, रविना पावडे उपस्थित होते.