मुंबई – मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये होत असलेल्या तुफानी पावसामुळे मुंबई हायकोर्टाने आजचे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यात व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे होणारी सुनावणीही थांबवण्यात आली आहे.
आज रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावरही व्हिडिओद्वारे सुनावणी होणार होती तीही आता त्यामुळे पुढे ढकलली गेली आहे. तसेच कंगना राणावत हिने मुंबई महापालिकेच्या कारवाईच्या विरोधात केलेल्या आव्हान अर्जावरही आज सुनावणी होणार होती.
आज ज्या प्रकरणांची सुनावणी होणार होती त्या प्रकरणांची सुनावणी उद्या गुरुवारी घेतली जाणार आहे, अशी माहिती हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपगरांमध्ये काल रात्रीपासून तुफानी पाऊस पडत आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.