नांदे येथील झेडपी शाळेत मॉडेल संगणक लॅब सुरू
पिरंगुट – सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे पुढील प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी संगणकाचे नवीन व अद्ययावत ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
नांदे (ता. मुळशी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत मॉडेल संगणक कक्षाचे उदघाटन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या संगणक कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होत.
येथील शाळेत मॉडेल स्कूल अंर्तगत अमेझॉन फ्युचर इंजिनिअर प्रकल्पातंर्गत लीडर फॉर इक्विटी पायजॅम फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही संगणक लॅब उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील निवडक 15 शाळांमध्ये ही लॅब उभारण्यात आली असून नांदे येथील शाळेत प्रत्यक्ष स्वरूपात उद्घाटन झाले तर इतर शाळात ऑनलाइन उद्घाटन झाले.
या उपक्रमासाठी पायजॅमचे शोएब दार व लिडरचे मधुकर भानुरी यांचे विशेष योगदान आहे. या निमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या प्राचार्या शोभा खंदारे, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, गटविकास अधिकारी संदीप जठार, शिक्षण विस्तार अधिकारी ताम्हाणे, केंद्रप्रमुख ठकोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद म्हणाल, मॉडेल स्कूल उपक्रमातंर्गत 23 कलमी कार्यक्रम राबविला जाईल. हा प्रकल्प देशात अव्वल दर्जाचा होण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. यावेळी सरपंच निकिता रानवडे, माजी सरपंच प्रशांत रानवडे, उपसरपंच गुलाब ढमाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन डांगे, सदस्य सुनील जाधव, संघमित्रा ओव्हाळ, सारिका ढमाले, शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली भंडारी, सागर जाधव, विजय डांगे, गणेश रानवडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.