सासवड – सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाल्याची घटना घडल्याची चर्चा पुरंदर तहसील कार्यालयात दबक्या आवाजामध्ये आहे.
तहसील कचेरीतील स्ट्राँगरूम मध्ये प्रशिक्षणासाठी आणलेल्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. तहसील कार्यालयास शनिवार आणि रविवारी दोन दिवस सुट्टी होती.
सोमवारी (दि, 5)सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकार्यांच्या निदर्शनास आले की स्ट्राँगरूमचे कुलूप तोडण्यात आलेल आहे.
या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरी गेल्याची चर्चा रंगत होती. तर तहसील कार्यालयाची सुरक्षा रामभरोसेे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.