प्राथमिक शिक्षक संघाकडून तहसीलदारांना निवेदन
टाकळी हाजी : शिरूर तालुका व जिल्हा शिक्षक संघ प्रतिनिधी यांनी लोकसभा निवडणूक नियुक्ती संदर्भात शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देत चर्चा करण्यात आल्याचे शिक्षक नेते संतोष शेवाळे यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी प्रतिनिधी यांना दिले .
यावेळी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंडे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, जिल्हा सहचिटणीस
सोमनाथ गायकवाड, शिक्षक नेते संतोष शेवाळे, अप्पासाहेब रसाळ, आबासाहेब जाधव, संतोष जाधव, संजयकुमार वाळके, रमेश उबाळे, मोहन बोरकर, संदीप सोनवणे, संतोष घावटे आदी उपस्थित होते.
शिक्षकांना निवडणूक आदेश देताना बीएलओ असलेल्या शिक्षकांना वगळण्यात यावे. तसेच दुर्धर आजारी शिक्षकांना आदेश देऊ नयेत. तसेच महिला शिक्षकांना स्वत:च्या तालुक्यातच आदेश द्यावेत, अशी मागणी तालुकाध्यक्ष संतोष गावडे यांनी केली आहे या मागण्यांचे निवेदन देण्यात आलेआहे.