आंबेठाण – अनुसूचित जमातीच्या सुचित धनगर ,धनगड हे दोन्हीही शब्द नाहीत. राज्यात “धनगड’ ही जमातच नाही. धनगर ही “जात’ आहे, “जमात’ नाही. त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या सुचित समावेश करू नये. अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे ट्रायबल फोरम पुणे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या सुचित ऊहरपसरव (धांगड) या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे. त्याचे भाषांतर ‘धांगड’ असे हवे आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक 36 वर “ओरॉंन’ जमात आहे. तीची पोटजमात धांगड आहे. ओरॉंन ही भारतातील प्रमुख जमात आहे. तीला 7 राज्यांच्या सुचित दर्शविले आहे. महाराष्ट्रात ओरॉंन, धांगड नाहीतच. पण अनुसूचित जमातीच्या सुचित आहे.
संविधान आदेशात प्रमुख जमातीनंतर त्यांच्या पोटजमाती दर्शविल्या आहे. ओरॉंनच्या शेतात, घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय.या दोन्ही जमातीचे खानपान, रितीरिवाज, प्रथा, परंपरा, विधीसंस्कार सारखेच आहेत.
धनगर जातीचा या जमातींशी तीळमात्रही संबंध नाही. 1911 च्या जनगणनेमधील तक्ता क्रमांक 6 केवळ जातीचा आहे. त्यामध्ये क्रमांक 7 वर धनगर “जात’ म्हणूनच नोंद आहे. 1911 मध्ये बॉंम्बे प्रेसीडेंन्सी, सी.पी.अँड बेरार, मराठवाडा या तीन प्रांतांत धनगर “जात’ म्हणूनच उल्लेख आहे. “जमात’ म्हणून नाही.
केंद्राने आधीच प्रस्ताव नाकारला
महाराष्ट्र राज्य शासनाने 12 जून 1979 ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. यावर संबंधित विभागात सखोल चर्चा ही झाली. पण धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करु शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने 1981 मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.
न्यायालयानेही ‘जात’च ठरवली
उत्तरप्रदेशात अलाहाबाद न्यायालयात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने 17 जुलै 2009 रोजी याचिका दाखल केली होती. त्याचा क्रमांक रिट सी.नं. 40462 / 2009 असा आहे. न्यायालयाने 14 मार्च 2014 रोजी निकाल देत, धनगर ही “जात’ ठरवली आहे, जमात नाही. दुसरीही याचिका क्र. रिट सी नं.12436/2007 यातही निर्णय देत धनगर ही “जात’ ठरवली आहे.’जमात’ नाही.