आळंदी – नूतन वर्षाभिनंदन व शौर्य दिनानिमित्त आळंदी येथे खेड तालुका दलित पँथर संघटनेचे अध्यक्ष रवींद्र रंधवे यांच्या नेतृत्वाखाली शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांना 5 हजार मोतीचुर लाडू, 5 हजार पाणी बॉटल मोफत वाटप करण्यात आले.
या निमित्ताने उद्योजक विनय देवकर, अतुल चिकटकर, विकास बडगे, सुहास देवकर, चेतन कुर्हाडे, रोहिदास तापकीर, रमेश गोगावले, प्रशांत कुर्हाडे, गोविंद कुर्हाडे, साहिल विरोकर,
कुणाल माने, पुरुषोत्तम गिरी, प्रल्हाद सानप, नारायण शिंदे, राज यादव, गुड्डू चौधरी, संतोष रंधवे, मुन्ना रंधवे, गणेश रंधवे, राहुल रंधवे, गणेश लाड, प्रशांत राजे, धीरज कांबळे, पंकज शिंदे, प्रसेनजीत रंधवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.