सातारा – आज विविध ठिकाणी जेष्ठ नागरिक संघ पाहायला मिळतात. प्रत्येक जेष्ठ नागरिकाकडे अनुभवाची खाण असते. अनेक चांगले- वाईट अनुभव घेऊन त्यातून जीवन जगण्याची कला त्यांनी अवगत केलेली असते. त्यामुळेच जेष्ठ नागरिक हे समाजाचे खरे दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन आ. विलासपूर येथील अजिंक्य जेष्ठ नागरिक संघाला कै. श्री. बी.जी. देशमुख उत्कृष्ट जेष्ठ नागरिक संघ ‘आय.एल.सी.आय. पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार मिळाला. यानिमित्त फिरोज पठाण यांच्या वतीने आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते अजिंक्य जेष्ठ नागरिक संघाचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी फिरोज पठाण, संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, उपाध्यक्ष प्रल्हाद साठे, सचिव पांडुरंग बिचकर, सर्व सदस्य, शशिकांत पारेख, माजी सरपंच बाळासाहेब पिसाळ, अभय जगताप, अमित महिपाल, प्रकाश पाटील, दादा जाधव, रवी पवार, पूनम निकम, रुपाली घाडगे, हेमलता किरवे, वनिता कन्हेरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सर्व जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वानीच सक्रिय राहिले पाहिजे. जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातून युवा पिढी सक्षम होत असते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या सल्ल्याचा सर्वांनी आदर करून मार्गक्रमण करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.