1800 सायकलिस्ट पंढरपुरात दाखल
खडकवासला – पंढरपूर सायकल क्लब आयोजित सायकल वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 1800 सायकलिस्ट पंढरपुरात दाखल झाले होते. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून सुमारे 1800 सायकलिस्ट याठिकाणी एकत्र आले. सर्व सायकलिस्टने पंढरपूरची सायकलवर नगर प्रदक्षिणा करून रिंगण सोहळाही पार पडला व प्लॅस्टिक मुक्त भारत हा संदेश सर्वाना दिला.
पुण्यातील खडकवासला स्पोर्टस फाउंडेशन ग्रुपने खडकवासला ते पंढरपूर 225 किलोमीटर सायकल वारी केली. यावेळी खडकवासला स्पोर्टस फाउंडेशन टीमचे पंढरपूर सायकलिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या पंढरपूर वारी 2022 कार्यक्रमात सर्वांना सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची परिक्रमा पूर्ण करणारे खडकवासला गावचे सुपुत्र भरत भोसले यांचाही पूर्ण महाराष्ट्रातील सायकल परिवारासमोर गौरविण्यात आले. निरोगी राहण्यासाठी काहीतरी व्यायाम आवश्यकच आहे. रोज थोडी तरी सायकलिंग करा, जगात भारी सायकलवारी तसेच तंदुरुस्ती फिट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सायकलिंग करावी, असा संदेश खडकवासला स्पोर्टस फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आला.
या सायकल वारीत खडकवासला स्पोर्टस फाउंडेशनचे भरत भोसले, अमर मते, आझाद मते, सागर मते, ज्ञानेश्वर समगीर, मंदार मते, नंदकिशोर मते, दिपक मते, किरण मते, गणेश गागरे, सुरेंद्र भोसले, नागेश भोसले आदी.