बारामतीत अजिंक्य बझारचे उद्घाटन
बारामती – बारामती तालुक्यात सर्वप्रथम मॉल संस्कृती सुरू करून यशस्वी व्यवसाय केला. ग्राहकांना गुणवत्ता व दर्जा देत गांधी कुटुंबीयांनी ग्राहकाची उत्तम सेवा केल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
इंदापूर रस्त्यावरील अजिंक्य बझार मॉलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, योगेश जगताप, राष्ट्रवादीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, संभाजी होळकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, विश्वास देवकाते आदी मान्यवर व ग्राहक उपस्थित होते. बारामतीचा चौफेर विकास होत असताना ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेल्या मॉलमुळे बारामतीच्या वैभवात भर पडेल, असेही पवार यांनी संगितले.
दहा हजार स्केवर फूटच्या भव्य दालनात किराणा, प्लॅस्टिक, कॉस्मेटिक, स्टील, खेळणी, कॉक्ररी, ड्रायफ्रूट्स आदी रास्त भावात ग्राहकांना मिळणार आहेत. नेहमीप्रमाणे सण, उत्सवावेळी विविध सवलतीच्या ऑफर असणार असल्याचे अजिंक्य बझार मॉलच्या संचालिका धनश्री गांधी यांनी सांगितले.
मॉल सुरू झाल्यावर खरेदी करणारे पहिले तीन भाग्यवान ग्राहक व जागेचे मालक बोरावके बंधू यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. इंद्रजीत गांधी, अतुल गांधी, राजकुमार गांधी व अजिंक्य गांधी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले.