मुंबई – बॉलीवुड की गॉर्जियस स्टार करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या संपूर्ण कुटुंबासह लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. करीना – सैफ अली खान आणि दोन्ही मुले तैमूर आणि जेह यांच्यासोबत तिने सोशल काही फोटोही शेअर केले आहे.
View this post on Instagram
स्टार कपलच्या व्हेकेशनचे अनेक फोटो चाहत्यांची मने जिंकत आहेत. मात्र सुट्टीतील सैफ आणि करिनाचा एक न पाहिलेला फोटो एका खास कारणामुळे चर्चेत आहे.
करीना कपूर तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या व्हेकेशनचे फोटो सतत शेअर करत असते. चाहतेही या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मात्र आता करिनाच्या फॅन पेजवर तिचा आणि सैफचा एक न पाहिलेला फोटो व्हायरल होत आहे,या फोटोत करिनाच्या तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची बातमी चर्चेत आली आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करीना कपूर काळ्या रंगाच्या टँक टॉपमध्ये दिसत आहे. करिनाने स्लिंग बॅग कॅरी केली आहे. हाफ टाय केसांमध्ये करीना खूपच सुंदर दिसते. मात्र चाहत्यांच्या नजरा करिनाच्या पोटावर खिळल्या आहेत. चाहते करिनाच्या पोटाला बेबी बंप म्हणत आहेत. करीनाचा फोटो पाहिल्यानंतर, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचा विश्वास आहे की ती तिसऱ्यांदा आई होणार आहे आणि फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे, त्याचवेळी काही युजर्सचे असेही म्हणणे आहे की, करीनाचा हा फोटो जुना आहे.
करिनाच्या व्हायरल फोटोवर एका यूजरने कमेंट केली ,’करीना प्रेग्नंट आहे.करीना पुन्हा प्रेग्नंट आहे का?’ असं म्हणत करीनाचे चाहते या फोटोवर कॉमेंट करत आहे. आता करीना कपूर खरोखरच तिसऱ्यांदा आई होणार आहे कीआता फक्त करीनाच या चर्चांवर पूर्णविराम लावू शकते.