पुरंदरच्या उपविभागीय अधिकार्यांचे तहसीलदारांना आदेश
लेखी आश्वासनानंतर रिपाइंचे आंदोलन मागे
सासवड : पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर व नायगाव येथील अवैध उत्खनन करणार्यांवर कारवाई केली जाईल, खोटे पंचनामे करणार्या मंडल अधिकारी व तलाठी यांना नोटीसा बजविल्या आहेत. नागरी सुविधा केंद्रावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे.
पारधी समाजाच्या घरकुलाच्या जागेसाठी व दाखल्याबाबत प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. पांडेश्वर येथील खोट्या वारस नोंदीबाबत तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे. तर पांडेश्वर येथील अनधिकृत खडीक्रेशरचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी तहसीलदार विक्रम रजपूत यांना दिल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णू भोसले यांनी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने तीन दिवस, जागरण गोंधळ आंदोलन, ढोलताशा सनई आंदोलन, व मरीआईवाले पोतराज आंदोलन करुनर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अनधिकृत खडीक्रेशरचे काम करणार्या व्यक्तीला प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार करण्यात आली होती. असे विष्णू भोसले यांनी वेळ सांगितले.
यावेळी श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश केदारी, प्रदेश कार्याध्यक्ष विष्णू भोसले, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नेते शकुर शेख, स्टीवन जोसेफ, पुरुषोत्तम पवार, सुहास सहजराव, नामदेव नेटके, बळीराम सोनवणे, भिवा वळकुंदे, विजय घोडेस्वार, दीपक धेंडे, स्वप्निल पाटोळे, महादेव खेंगरे पाटील, आनंद लकडे, अनिल साळवे, सुनिल साळवी,
मारुती साळवी, प्रा. सदाशिव कांबळे, शाम जगताप, राहुल गायकवाड, रमेश रणदिवे, भरत शिंदे, माधुरी शिंदे, वेणिला पवार, सुरज साळवे, यश शिंदे, कमलाकर साळवी, सचिन कांबळे, गुलाबराव सोनवणे, रामकृष्ण वाघमारे, सागर काळे, विठ्ठल शिंदे, अण्णा शिंदे, अजय शिंदे, प्रियंका शिंदे, विश्वास भोसले उपस्थित होते.