बारामतीत रंजन तावरे यांची माहिती
बारामती – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोदी 9 जनसंपर्क अभियान बारामती विधानसभा मतदारसंघात जोमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती बारामती विधानसभा प्रमुख रंजन तावरे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभा मतदारसंघात व महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदारसंघामध्ये मोदी 9 विशेष जनसंपर्क अभियान होत आहे.
बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघामधील कोअर कमीटी व सर्व कार्यकर्ते यांच्या समवेत 11 प्रकारचे विविध कार्यक्रम घेणार आहोत. यावेळी वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा, टिफीन बैठक, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन, योग दिवस, व्यापारी संमेलन, प्रबुध्द संमेलन, विकास तीर्थ, सोशल मीडिया पत्रकार परिषद, मन की बात कार्यक्रम व बूथ स्तरावरील कार्यक्रम होणार असल्याची माहिती बारामती विधानसभा प्रमुख रंजन तावरे यांनी दिली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, ऍड. जी. बी. गावडे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, युवराज तावरे, अभिजीत देवकाते, मच्छिंद्र टिंगरे, प्रमोद खराडे, प्रमोद डिंबळे, ऍड. श्याम कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे, महाजन 25 रोजी बारामतीत
बारामती शहरात (दि.25) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा जयंती सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले.