गराडेत विविध उपक्रम उत्साहात : राजकीयसह नागरिकांची गर्दी
गराडे – पुरंदर तालुक्यातील लाडके व्यक्तिमत्व व सर्वसामान्यांचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, पुरंदर तालुका भाजपाचे प्रभारी, पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य, कात्रज दूध संघाचे माजी संचालक आणि गरिबांचे कैवारी श्री गंगारामदादा जगदाळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा नुकताच गराडे (ता. पुरंदर) येथील नवखंडेनाथ मंदिर ग्रामपंचायत प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात कार्येकर्त्यांनी साजरा केला.
या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्येकर्त्यांनी अनाथाश्रमात अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, कुस्ती, क्रिकेट स्पर्धा आदी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. तर अभीष्टचिंतनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती. त्यात राजकीय व सर्वसामान्य नागरिकांसह कार्येकर्त्यांची गर्दी केली होती.
गराडे येथे कर्हे काठच्या लाल मातीचा किताब या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आमदार राहुल कुल, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उद्योजक माऊलीतात्या भिंताडे, भाजप नेत्या स्नेहल दगडे, अजिंक्य टेकवडे, संतोष एकनाथ जगताप, संदीप मोडक, शहाजी गायकवाड, खानवडीचे उपसरपंच अॅड. स्वप्नील होले, जालिंदर जगताप, अॅॅड. शिवाजी कोलते, खानवडी गावच्या सरपंच स्वपनाली होले, महेश राऊत, गणेश मेमाणे, साकेत जगताप, अमोल जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी गराडे गावचे सरपंच नवनाथ गायकवाड ,उपसरपंच अमित दूरकर, आयोजक समीर तरवडे, निलेश जगदाळे, विजय ढोणे, संजय रावडे, दिलीप कटके, दयानंद फडतरे, मयूर फडतरे, जी. एस. शेंडकर, संजय कामठे, शहाजी कामठे, मारुती कामठे, आबा होले, नवनाथ कामधे, संतोष बडदे, संदीप घाटे, जालिंदर जगताप, शिवाजी कोलते, महेश राऊत, महादेव शेंडकर, शहाजी गायकवाड, मोहन तळेकर, दशरथ घोरपडे, विक्रम सस्ते, दत्तात्रय कदम, नितीन जगदाळे, रोहित खवले, दीपक जावळे, हनुमंत साळुंके आदींसह पुणे जिल्हा व पुरंदर तालुक्यातील विविध पक्ष, संस्था, संघटना, मंडळांच्या पदाधिकारी, गराडे ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी उपस्थित राहून गंगाराम जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जगदाळे यांनी केले.